Home | Maharashtra | Pune | fire on pmpml bus at pimpri pune

पुण्यात PMPML बसला आग; असे वाचविण्यात आले प्रवाशांचे प्राण, पाहा VIDEO

प्रतिनिधी | Update - Feb 12, 2018, 05:27 PM IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर असलेल्या पीएमपीएमएल (सीएनजी) बसने अचानक पेट घेतला. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाह

  • fire on pmpml bus at pimpri pune

    पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर असलेल्या पीएमपीएमएल (सीएनजी) बसने अचानक पेट घेतला. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. ही घटना पावणेचारच्या सुमारास घडली. या बसमध्ये 15 प्रवासी होते. चालकाने वेळीच प्रसंगवधान दाखवत प्रवाशांना बाहेर काढले, अशी माहिती वाहक मूलचंद यादव यांनी दिली.

    पिंपरीवरून भोसरी येथे ही पीएमपीएमएल बस (एम.एच.-12 एफ.झेड.-8376) जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आल्यानंतर अचानक बसला आग लागली. महापालिकेसमोर बस आपल्यानंतर अचानक इंजिनमधून धूर येत होता. यामुळे चालक दीपक भरणे यांनी बस थांबवून प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना खाली उतरविले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. बसची चौथी फेरी होती. बसला आग लागल्याची माहिती तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बसचा समोरचा आणि आतील काही भाग जळून खाक झाला आहे.

    पुढील स्लाईडवर व्हिडीओ

Trending