आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: इंडियन आर्मीतील माजी कॅप्टनची अज्ञातांकडून हत्या, अनेक वर्षांपासून राहत होते फुटपाथवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविंद्र बाली पुण्यातील कॅम्प भागात बाली फुटपाथवर छोटासा टेंट लावून राहत होते. - Divya Marathi
रविंद्र बाली पुण्यातील कॅम्प भागात बाली फुटपाथवर छोटासा टेंट लावून राहत होते.

पुणे- भारतीय लष्करात कॅप्टन राहिलेले रवींद्र बाली (67) हे पुण्यातील कॅन्टोंनमेंट एरियात गुरुवारी मृतावस्थेत आढळले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन अज्ञात लोकांनी त्यांच्या डोक्यात वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. बाली हे फुटपाथवर राहत होते.

 

बंगल्यातील सुरक्षारक्षकाने पाहिली होती ही घटना-

 

- पोलिसांच्या हवाल्याने न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, पुण्यातील कॅम्प भागात बाली फुटपाथवर छोटासा टेंट लावून राहत होते. 

- "एका बंगल्यातील सुरक्षारक्षकाने पाहिले होते की, दोन अज्ञात लोकांनी बाली यांच्यावर हल्ला केला व ते तेथून पळून गेले.' नंतर याच सुरक्षारक्षकाने पोलिसांना माहिती दिली.

 

अनेक वर्षापासून कुटुंबियांच्या संपर्कात नव्हते बाली-

 

- अधिका-याचे म्हणणे आहे की, बाली कित्येक वर्षापासून कुटुंबांच्या संपर्कात नव्हते व एक वेगळेच आयुष्य जगत होते.
- "तपासादरम्यान आम्ही त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेत आहोत जेणेकरून या प्रकरणाची चौकशी करणे सोपे जाईल.''
- पोलिसांनी सांगितले की, दोन अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे त्यांना लवकरच अटक केली जाईल.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...