आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगरेट पेटविण्यास काडीपेटी न दिल्याने निवृत्त कॅप्टन रविंद्र बालींचा खून, आरोपीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविंद्र बाली पुण्यातील कॅम्प भागात बाली फुटपाथवर छोटासा टेंट लावून राहत होते. - Divya Marathi
रविंद्र बाली पुण्यातील कॅम्प भागात बाली फुटपाथवर छोटासा टेंट लावून राहत होते.

पुणे- भारतीय लष्करात कॅप्टन म्हणून देशसेवा केलेल्या अाणि काैटुंबिक कारणांमुळे पदपथावर दिवस जगण्याची वेळ अालेल्या, रविंद्रकुमार बाली (वय- 65, मूळ. राजस्थान) यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस अाणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथकास यश अाले अाहे. सिगरेट पेटविण्यास दारुडया तरुणास माचीस न दिल्याने, सदर दाेघांत झालेल्या वादातून सिमेंटचा ब्लाॅक बाली यांच्या डाेक्यात मारुन निघृण खून केल्याची कबुली अाराेपीने दिली अाहे. 

 

गुन्हे शाखेच्या पथकाने अाराेपी राॅबीन अॅन्थाेनी लाझरस (वय-21, रा. तळाेजा, ता. पनवेल, रायगड) येथून अटक केली अाहे. 

 

अाराेपीने एक फेब्रुवारी राेजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन येऊन डाेक्यात सिमेंट ब्लाॅक घालून कॅप्टन बाली यांचा खून करुन पसार झाला होता. पाेलिसांनी घटनेनंतर लष्कर भागातील सीसीटीव्ही फुटेजचही पडताळणी केली असता, एक संशयित घटनास्थळापासून एका जवळल्या गल्लीत पळून जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पाेलिसांनी सदर संशयितचा शाेध सुरु केला असता अाराेपी राॅबिन लाझरस याचे नाव निष्पन्न झाले व ताे गुन्हा झाल्यापासून फरार झाला असल्याची माहिती उघड झाली. 

 

गुन्हे शाखा युनिट तीनचे पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सिताराम माेरे यांना माहिती मिळाली की, अाराेपी राॅबीन हा पनवेल परिसरात अाहे. त्यानुसार पाेलिसांचे एक पथक पनवेल येथे जाऊन त्यांनी अाराेपीचा शाेध घेऊन त्यास जेरबंद केले.

 

अाराेपी राॅबीन व त्याचा मित्र कुणाल माेरे हे घटनेच्या दिवशी केदारी पेट्राेल पंपाजवळून दारु घेवून अाेल्ड नार्इन्टी नार्इन जवळील टेकडीवर दारु पित बसले. मित्रांसाेबत दारु पिऊन ती घरी जाण्यासाठी जात असताना, त्यांची गाडी बंद पडली. म्हणून कुणाल माेरे हे याचा भाऊ तेजस माेरे यास दुचाकी घेऊन बाेलावले व सदर तिघे गाडीवर जात हाेताे. मात्र, थाेडयाच अंतरावर पेट्राेल संपल्याने गाडीस कुणाल हा धक्का मारत व अाराेपी स्वत: पाठीमागून चालत घराकडे जात हाेते. त्यावेळी राॅबीन यास सिगारेट अाेढायची असल्याने ताे डाॅक्टर काेयाजी राेडवरील फुटपाथवर असणाऱ्या टेंन्टमध्ये झाेपलेल्या मयत रविंद्रकुमार बाली यांना उठवले व माचीस पाहिजे असे सांगितले. बाली यांनी त्यास माचीस दिली नाही तेव्हा बाली व अाराेपी राॅबीन यांच्यात झटापट हाेवून मारामारी झाली व दाेघात तिथे भांडण झाले. त्यावेळी राॅबीन याने रस्त्याचे जवळीलच सिमेंटचा ब्लाॅक उचलून बाली यांचे डाेक्यात दाेन-तीन वेळा मारुन त्यांचा खून केला. 

 

खुनानंतर अाराेपीने बदलली केशरचना-

 

पाेलिस उपअायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, कॅप्टन बाली यांचा खून केल्यानंतर राॅबीन याने स्वत:चे केस महंमदवाडी येथे कापून काेणी अाेळख नये याकरिता केशरचना बदलली. तसेच मित्रांकडून स्वत:च्या घरातील कपडे अाणून काेणास काही कळू नये म्हणून मुंबर्इ येथे जावून पेंदर, तळाेजा, ता. पनवेल, रायगड येथे चायनीज गाडीवर काम करु लागला हाेता. कॅप्टन बाली यांची घरची अार्थिक परिस्थिती पूर्वी चांगली हाेत व सैन्यात ते कॅप्टन पदावर हाेते. मात्र, सैन्यात असताना अार्इवडीलांची काळजी घेण्यास काेणी नसल्याने त्यांनी नाेकरीचा राजीनामा देऊन कुटुंबियाचा सांभाळ केला. मात्र, त्यांचे कुटुंबांसोबत अार्थिक कारणावरुन वाद झाल्याने ते पुण्यात अाले हाेते. खासगी नाेकरीत ही अडथळे अाल्याने ते फुटपाथवर राहून गुजराण करत हाेते. 

बातम्या आणखी आहेत...