आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
पिंपरी चिंचवड- पिंपरी चिंचवड येथील मनपा शाळेतील सातवी ते दहावीच्या विद्याथीनींना मोफत सॅनेटरी नॅपकीन देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 2018-19 वर्षाचा 3,506 कोटींरुपयांचा अर्थसंल्प सादर केला. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र सहा हजार लिटरवरील पाणी वापरावर दुप्पट पाणीपट्टीची वाढ करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावली जाणार आहे.
अर्थसंकल्पात आरंभीची शिल्लक 586 कोटी रुपये, स्थानिक संस्था कर 1593 कोटी, कर संकलन 465 कोटी, गुंतवणुकीवरील व्याज व इतर 169 कोटी, पाणी पट्टी इतर 69 कोटी, बांधकाम परवाना विभाग 350 कोटी, अनुदान 20 कोटी, भांडवली जमा 103 कोटी व इतर विभागांची जमा 149 कोटी रूपये जमा होणार आहे. तर खर्च सामान्य प्रशासन विभागा 56 कोटी, शहर रचना व नियोजन 49 कोटी, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्य 229 कोटी, वैद्यकीय 157 कोटी, आरोग्य 156 कोटी, प्राथमिक इतर शिक्षण 178 कोटी, उद्यान व पर्यअवरण 59 कोटी, इतर विभाग 384 कोटी,क अंदाजपत्र खर्च 219 कोटी, स्थानिक संस्था कर व करसंकलन 45 कोटी, भांडवली खर्च 1275 कोटी, कर्ज निवारण व इतर निधी अखेरच्या शिलकसह 529 कोटी रुपये असा 3465 कोटी खर्च करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.