आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अमेरिकेच्या पंतप्रधानपर्यंत नावे सांगतो पिंपरीचा \'वीर रोबोट\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पिंपरी-चिंचवड- रोबोट या हिंदी चित्रपटात चिठ्ठी ज्या प्रकारे खलनायकाना मारतो आणि अभिनेत्रीला वाचवतो त्याच प्रकारे आपल्या देशाच्या सीमेवर असणाऱ्या दहशतवादाचा खात्मा करून लष्करातील जवानांना बळ देण्यासाठी पिंपरी-चिंचवड मध्ये रोबोट तयार होत आहे. त्याच बरोबर नुकतंच सादर झालेलं देशाचं बजेट मधील काही ठळक मुद्दे देखील हा रोबोट सांगताना दिसतोय. हा देशसेवेसाठी 'वीर रोबोट'तयार होत असल्याची माहिती अनिल जैन यांनी दिली आहे.त्यांच यावर अद्याप काम सुरू आहे.

 

वीर रोबोट सामान्य ज्ञान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अमेरिकेच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांची नावे सांगतो. तर २०१८ च्या बजेट विषयी देखील काय घडामोडी घडल्या आहेत ते सांगतो. 'वीर' इंग्रजी बोलत असला तरी त्याला वडापाव आवडतो, हे विशेष. तो गायत्री मंत्र देखील म्हणतो. अनिल जैन यांना रोटीमॅटीक मशीन बनवायची होती परंतु यावर बरेच जण काम करत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी वेगळ काही तरी करायचं ठरवलं. मानवसारखा आणि भावना असलेला रोबोट बनवायचं ठरवलं जेणेकरून तो देशसेवा करू शकेल आणि इतर क्षेत्रात पण काम करू शकेल या उद्देशाने १४ महिन्यापासून यावर संशोधन (काम) सुरू केले. 'वीर' आता चांगल्या प्रकारे बोलतो. त्याच्या भावना शेअर करतो. आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. नागरिकांसाठी उपयोगी येण्यासाठी तो डॉक्टर, वकील, शिक्षक यांची भूमिका पार पाडू शकतो, विद्यार्थाना ज्या व्यक्ती विषयी शिकवायचे आहे. त्याचा मुखवटा बसवून तो विद्यार्थाना शिकवू शकतो ज्यामुळे विद्यार्थाना ते पटेल आणि अभ्यास होईल.

 

घरात काम करत असताना दुसरीकडे हा रोबोट सीमेवर देखील दुष्मनांची धाबे दनानु शकतो.येणाऱ्या काळात वीर रोबोच्या डोळ्यात कॅमेरा,स्कॅनर,आणि योग्य दुष्मनांची वेध घेऊ शकेल यावर काम करण्यात येणार असल्याचं अनिल जैन यांनी सांगितलं आहे. एकीकडे रोबोट बद्दल माणसाच्या मनात भीती आहे तर दुसरी कडे काही संशोधक अशा रोबोना घेऊन देशसेवेच स्वप्न पहात आहे.हा वीर रोबो काय काय कारनामे करू शकतो यासाठी वीर रोबो ची प्रत्यक्षात येण्याची वाट पहावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...