आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायपरमध्ये लपवलेले 17 लाखांचे साेने पुणे विमानतळावर जप्त; एकाला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुबईवरून पुणे विमानतळावर अालेल्या  एका प्रवाशाकडून १७ लाख ८७ हजार रुपये किमतीचे ६०६.८३ ग्रॅम वजनाचे कच्चे साेने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी जप्त केले अाहे.  संबंधित प्रवाशाची चाैकशी सुरू अाहे. 


दुबईवरून स्पाइसजेटचे एसजी-५२ हे विमान पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर विमानातील प्रवासी व त्यांच्या सामानाची सीमा शुल्क विभागाचे अधिकारी तपासणी करत हाेते. त्या वेळी एका प्रवाशाच्या बॅगेतील सामानात लहान मुलांच्या ४८ डायपरमध्ये लपवून अाणलेले ६०६.८३ ग्रॅम वजनाचे कच्चे साेन्याचे २८८ तुकडे मिळून अाले. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिनियम १९६२च्या तरतूदींनुसार हे साेने जप्त केले असून संबंधित प्रवाशाकडे चाैकशी सुरू केली अाहे. त्याचप्रमाणे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरवडा परिसरातून नूतन वर्षाच्या निमित्ताने अाणण्यात अालेला ५२ किलाेचा गांजा जप्त केला अाहे.

बातम्या आणखी आहेत...