आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळिमा: सहा वर्षांच्या नातीसोबत 67 वर्षांच्या आजोबांचे अनैसर्गिक कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सहा वर्षांच्या नातीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 67 वर्षांच्या आजोबाला बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत अटक केली आली आहे. याप्रकरणी कोर्टाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

 

हडपसर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस अधिकारी एम. आर. निकम दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी घरी सहा वर्षांची एकटी मुलगी झोपली होती. तिची आई कामाला गेली होती. आजीही बाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन आजोबाने सहा वर्षांची मुलगी झोपेत असताना तिच्यावर अत्याचार केला. याबाबत मुलीने दुसऱ्या दिवशी झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलीला विचारले असता, तिने हकीकत सांगितली. त्यावरून हडपसर पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...