आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात जमिनीतून गरम पाणी, PCMC मधील एका उद्यानातील घटना, नागरिकांमध्ये भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भोसरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळते गरम पाणी येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे. उद्यानात गरम पाण्याचा एक झरा अचानकपणे वाहु लागल्याने नागरिकांमधुन आश्चर्य व्यक्त केेले जात आहे.

 

प्लॅस्टिकची बाटली वितळते

हे पाणी एवढे गरम आहे कि प्लॅस्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान जमिनीतून गरम पाण्याचा झरा येण्यामागे नैसर्गिक चमत्कार नसून ‘थ्री फेज’ वायरमुळे पाणी गरम झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो, माहिती आणि व्हिडिओ
 

बातम्या आणखी आहेत...