आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईला कौशल्य शिक्षण दिले तर देश महासत्ता बनेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारत पुढे येत आहे. सर्वाधिक संख्येने असलेल्या तरुणांच्या हाताला काम मिळाले नाही तर हीच तरुणाई देशाच्या हिताची ठरण्याऐवजी घातक ठरू शकते. मात्र, याच तरुणाईला कौशल्य शिक्षण दिले तर आपला देश महासत्ता म्हणून उदयास येईल. त्यामुळे भविष्यात केवळ पदवी देणारे नव्हे, तर हाताला काम देणारे शिक्षण द्यावे लागेल,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.  


सिम्बायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या ‘स्किल सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद््घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्र. कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, कौशल्य विकास हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया आहे. या दृष्टीने कौशल्य विकास विद्यापीठ ही अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून देशाच्या विकासात विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे राहील. 

 

सिम्बायोसिस विद्यापीठ मार्गदर्शक ठरेल  
"औद्योगिक क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन या विद्यापीठात विविध उद्योग समूहांच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. कौशल्य शिक्षणाच्या कार्यशाळा आणि औद्योगिक केंद्रांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा येथील शिक्षण अधिक उपयुक्त ठरेल. देशात हे विद्यापीठ मार्गदर्शक ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...