आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादातून पुतण्याने जाळले चुलतीचे घर; दोघेही गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड - कौटुंबिक वादातून पुतण्याने चुलतीचे घर जाळल्याचा गंभीर प्रकार काळेवाडी मधील तापकीर नगर येथे घडला आहे. ही घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चुलती आणि पुतण्या दोघेही गंभीर भाजले आहेत. प्रीती संदीप सावंत आणि आरोपी नितीन सावंत अशी दोघांची नावे आहेत.

 

अधिक माहिती अशी की,प्रीती संदीप सावंत वय-६० आणि नितीन सावंत वय- २५ दोघे राहणार तापकीर नगर, भैया वाडी. हे दोघे चुलती आणि पुतण्या आहेत. दोघांमध्‍ये असलेल्‍या कैटूंबिक वादातून आज रात्री साडेआठच्या सुमारास पुतण्या नितीन ने चुलतीच्या घरात जाऊन रॉकेल ओतून घर पेटवून दिले, यात स्वतः नितीन भाजला असून चुलती प्रीती सावंत देखील गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यांनी येऊन जखमी दोघाना बाहेर काढले, त्यांना रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडली तेव्हा घरात प्रीती सावंत यांची सून होती ती या घटनेतून बचावल्या आहेत. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...