आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी वर्ष साखर धंद्याला अडचणीचे, कमी खर्चात कारखाना चालवून सभासदांना पैसे द्यावे- शरद पवार यांचा सल्‍ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आगामी वर्षात देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने पुढचे वर्ष साखर धंद्याला अडचणीचे आहे. कारखान्यांनी करता येईल तितकी काटकसर करावी. कमीत कमी खर्चात कारखाना चालवून सभासदांना चांगले पैसे देता येतील याची काळजी घ्यावी,’ असा सल्ला ज्येष्ठ नेते आणि वसंतदादा साखर संस्थेचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

  
‘व्हीएसआय’च्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. पवारांनी या वेळी साखर उद्योगासमोरील समस्यांचा आढावा घेतला. ते म्हणाले, पुढील हंगामातील उसाचे प्रचंड उत्पादन लक्षात घेता आतापासूनच गाळपाचे नियोजन करावे लागेल. अन्यथा मे-जून पर्यंत कारखाने चालवावे लागतील. यात ‘रिकव्हरी लॉस’ होऊन कारखान्यांचे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे लवकर गाळप सुरू करण्याचे नियोजन आतापासून करावे. अन्य कारखान्यांना ऊस दिल्यानंतर यापूर्वी उसाची किंमत वेळेत वर्ग झाली नाही. याची काटेकोर काळजी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

 

साखर आयातीचा गुंता  
“भारत साखर निर्यात करतो. जगाच्या बाजारात साखर आणतो. हे ठीक आहे, पण जगाची बाजारपेठ जशी तुम्हाला खुली आहे तशी तुमची बाजारपेठ (भारताची) तुम्हाला खुली करावी लागेल, असे ‘इंटरनॅशनल शुगर कन्सोर्शियम’ने भारत सरकारला सांगितले आहे. एकतर्फी सौदा चालणार नाही, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. याचा अर्थ आपण जेव्हा साखर निर्यात करतो तेव्हा इतर देशांची साखरसुद्धा भारतात आयात होणार,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले. अर्थात आपल्या येथील दर कमी असल्याने तशी शक्यता सध्या दिसत नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...