आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune Crime: दारुच्या नशेत तर्रर्र दीराने भावजईच्या डोक्यात केले कोयत्याने वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जिल्ह्यातील मंचरमध्ये मद्यपान करून आलेल्या दीराने भावजईवर किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल (रविवार) मध्यरात्री लांडेवाडी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी महिलेच्या मुलाने आरोपी सीताराम ढवळा खंडागळे याच्याविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ताईबाई नारायण खंडागळे (वय-40, रा.लांडेवाडी, ठाकरवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलगा अशोक नारायण खंडागळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संशयित आरोपी सीताराम हा मद्यपान करून आला होता. त्यानंतर भावजईला शुल्लक कारणावरून शिविगाळ केली. भावजई घराबाहेर आली आणि शिवीगाळ का करतो, असा जाब विचारला. याचाच राग मनात धरून आरोपीने कोयत्याने डोक्यात वार केले.

 

बातम्या आणखी आहेत...