आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डर देवेन शहा खूनप्रकरण: ठाण्यातून एकाला अटक, पिस्तूल आणि काडतुसे जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/मुंबई- पुण्यातील प्रभात रस्त्यावर बिल्डर देवेन शहा यांचा गोळ्या झाडून खून केल्या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातून आज (मंगळवार) एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्‍यात आलेले पिस्तूल आणि काही काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

 

डेक्कन पोलिसांनी शूटर रवींद्र सदाशिव चोरगे (वय- 48, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला रविवारी (21 जानेवारी) जळगावमधील हॉटेलमध्ये अटक केली होती.

 

दरम्यान, शनिवारी (20 जानेवारी) रात्री साडे अकरा वाजता दोन हल्लेखोरांनी बिल्डर देवेन शहा यांची गोळ्या घालून हत्या केली होती. हल्लेखाेरांचे छायाचित्र इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्याअाधारे संशयित अाराेपींची पाेलिसांनी अाेळख पटवली. रवी चाेरगे व राहुल शिवतारे अशी त्यांची नावे आहेत. पैशांच्या वादातूनच देवेन शहा यांची हत्या झाल्याचे तपासात समाेर आले अाहे.

 

पत्नीच्या वाढदिवशीच पतीची निर्घृण हत्या

- देवेन शहा यांच्या पत्नीचा शनिवारी (20 जानेवारी)वाढदिवस हाेता. हाॅटेलमध्ये कुटुंबीय वाढदिवस साजरा करून रात्री घरी अाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरून दोन जण शहा यांच्या इमारतीच्या खाली अाले. त्यांनी सुरक्षारक्षकास शहा यांना खाली बाेलावून अाणण्यास सांगितले. शहा हे अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अाल्यानंतर दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

 

खुनाचे धागेधोरे इंदूरपर्यंत...
इंदूरमधील जमीन विक्री व खरेदी करणारी व्यक्ती शहा यांच्या संपर्कात होती. पोलिसांचे पथक इंदोर येथे त्याच्याबाबत माहिती घेण्यासाठी गेले. परंतु, ती व्यक्ती तेथून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून यात आणखी काही लोक आहेत, याचीही शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...