आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घराला घरपण’ देणाऱ्या डीएसकेंचेच घर विक्रीला; सेंट्रल बँक करणार लिलाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘घराला घरपण देणारी माणसे’ अशा बॅनरखाली मागील ३६ वर्षांपासून मध्यमवर्गीय लाेकांना घरे उपलब्ध करून देणारे पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सध्या अार्थिक अडचणीत अाले अाहेत. हजाराे ठेवीदारांकडून घेतलेल्या २३० रुपयांची परतफेड न केल्याने त्यांना अटक करण्यात अाली अाहे. अाता एका बँकेच्या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांचाच पुण्यातील बंगला विकण्याची वेळ अाली अाहे.   


डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडच्या संचालिका हेमंती दीपक कुलकर्णी, दीपक कुलकर्णी (डीएसके), श्रीमती एच.डी.कुलकर्णी यांनी डीएसके ग्लाेबल एज्युकेशन अँड रिसर्च लिमिटेडसाठी सेंट्रल बँक अाॅफ इंडिया डेक्कन शाखा यांच्याकडून कर्ज घेतले हाेते. मात्र, सदर कर्जाची परतफेड न करण्यात अाल्याने बँकेने कारवार्इचा बडगा उगारला अाहे. बँकेकडे डीएसके यांनी तारण ठेवलेल्या सेनापती बापट रस्त्यावरील चतुःशृंगी टेकडीजवळील त्यांच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय  बँकेने घेतला अाहे. या घराची किमान किंमत ६६ काेटी ३९ लाख रुपये लिलावासाठी ठेवण्यात अाली अाहे. इच्छुक निविदाधारकास लिलावास ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी २८ फेब्रुवारी राेजी करता येणार अाहे.  

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कोण आहेत डीएसके? हिरवागार डोंगर, खळखळणारे झरे आणि डोळ्यांना सुखद अनुभूती देणार्‍या झाडा-झुडपांच्या सानिध्यात साकारलेला बंगलाही गमवावा लागणार...

बातम्या आणखी आहेत...