आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident: मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) पहाटे 4 वाजेच्या सुमारास वाकसाई परिसरात घडली.

 

साबु भीमन्ना भंडारे (वय-35) आणि पूजा साबु भंडारे (वय-3, दोघेही रा.ओळकाईवाडी) अशी मृतांची नावे आहे. हनुमंता भीमन्ना भंडारे यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

सूत्रांनुसार, साबु भीमन्ना भंडारे यांच्या दुचाकीवरून (एम-एच-14 बी-क्यू 2155) पुण्याच्या दिशेने येत होते. वाकसाई गावाजवळ येताच भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात साबू आणि पूजा या बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. भागामा ही गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

 

बातम्या आणखी आहेत...