आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेश वारीच्या नावाखाली पुण्यात नऊ जणांना लाखोंचा गंडा; प्रिस्टिजा सर्व्हिसेसविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमधील 10 जणांना परदेश परदेशात फिरायला घेऊन जाण्याचे अमिष दाखवून लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रहाटणी येथील प्रिस्टिजा सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीच्या चालकांविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी महेश बळीराम हळंदे (वय-36, रा.चिखली) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संकेत शेखर गोपाळे, विजय शिवाजी कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत गोपाल आणि शिवाजी कांबळे गुन्हा दाखल असलेले आरोपी हे प्रिस्टिजा सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे मालक आहेत. त्यांनी कंपनीच्या माध्यमातून सभासदांना पाच वर्षे देश विदेशात पर्य़टनासाठी पाठवण्याचे अमिष दाखवले. तसेच पर्य़टनादरम्यान मोफत थ्री स्टार, फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे कबूल केले.  हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान रहाटणी येथील कोकणे चौकातील रॉयल ट्रान्वील ऑफिसमध्ये घडला. कंपनीत पैसे गुंतवणार्‍या सभासदांना मॉलमध्ये खरेदीवर 50 टक्के सवलतीचे गिफ्ट कुपन देण्याचेही अमिष दाखवण्यात आले होते.

 

आरोपींनी दिलेल्या आमिषामुळे दहा जणांनी 8 लाख 60 हजार 500 रुपये गुंतवले. पैसे गुंतवूनही कोणताच फायदा मिळाला नसल्याने तसेच पर्यटनासाठीही न पाठवता सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...