आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: पिंपरी चिंचवड परिसरात गॅस सिलिंडरचा ब्लास्ट; दोन घरे जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाकड परिसरातील कस्पटेवस्तीमधील बांधकाम करणाऱ्या कामगाराच्या पत्राच्या झोपडीत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. नंतर भडकलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात     आणली आहे.

 

सूत्रांनुसार, वाकड येथील कस्पटेवस्तीत अनेक बांधकाम सुरू आहेत. कामगार पत्राच्या झोपड्यात राहातात. एका झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारी असणाऱ्या दोन झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. आग लागली तेव्हा झोपडीत कोणी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

 

बातम्या आणखी आहेत...