आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांना परमेश्वराचीही वाटत नाही भीती; अर्ध्या रात्री देवाच्या गाभार्‍यात जाऊन केले हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शाहुवाडी तालुक्यातील शिवारे येथील म‍ंदिरावर दोन चोरट्यांनी अर्ध्यारात्री डल्ला मारला. मूर्तिच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दानपेटी घेऊन चोरटे पसार झाले.

 

ही घटना मंदिराच्या गाभार्‍यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस फुटेजची मदत घेत आहेत.

 

काय आहे हे प्रकरण...?
- शिवारे येथे प्रसिद्ध बाळुमामा मंदिर आहे. येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
-7 जानेवारीला रात्री पुरोहीत मंदिर बंद करून घरी गेला. नंतर मध्य रात्री दोन चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
- चोरट्यांनी बाळुमामाच्या मूर्तीच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. रोख रक्कमही लांबवली.
- मंदिराच्या गाभार्‍यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही घटना कैद झाली.

- चोरट्यांनी बाळुमामाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्यानंतर दत्त मंदिरातील दान पेटी चोरली. त्यातील पैसे काढून पेटी ऊसाच्या शेतात फेकून दिली. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...