आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा तर \'भ्रम\'संकल्प...फक्त आकडे मोठे, पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- 'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही... बँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही... मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं!! हा तर 'भ्रम'संकल्प!!#Budget2018', अशा शब्दांत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारच्या कडाडून टीका केली आहे.


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. यावर सुप्रिया सुळे यांनी ट्‍वीट केले आहे.

 

दरम्यान, कृषी आणि शेतकऱ्यांना भरभरून देताना मात्र, मोदी सरकारने नोकरदारांबाबत हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्यांना 11 हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. परंतु, करप्रणालीत कुठलाही बदल न केल्याने नोकरदारवर्गात निराशा पसरली आहे.

शिक्षण, आरोग्य आणि गोरगरीबांसाठी अनेक योजना येत्या आर्थिक वर्षात केंद्र सरकार घेऊन येत आहे. 70 लाख नवीन नोकऱ्यांचेही आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले आहे. शिक्षण आणि आरोग्यासाठी सेसमध्ये 1 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक बील महागणार आहे. टीव्ही, मोबाईल महागणार आहेत. हा 88वा केंद्रीय अर्थसंकल्प होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकूण 87 केंद्रीय व अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेले आहेत. मोदी सरकारचा हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सुप्रिया सुळे यांचे अर्थसंकल्पावरील ट्‍वीट...

बातम्या आणखी आहेत...