आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक..पुण्यात एकाच दिवशी बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे चार घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या सांगवी हद्दीत एकाच दिवशी बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लग्नाचे अमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर तसेच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला तर एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक शोषण केल्याने ती गर्भवती राहिल्याप्रकरणी गुन्हे दाखल आले आहेत.

 

सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या गणेश मारुती मस्के, हरी गोविंद राठोड, अजय या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतोष महाले याच्या विरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नराधमाने 42 वर्षीय महिलेची 6 लाख 50 हजार रुपये आणि एक 16 हजार रुपयांचा मोबाइल,  अशी फसवणूक केली आहे.  एकाच दिवशी महिला अत्याचाराच्या चार घटना समोर अाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...