आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पुण्यातील चांदणी चौकात खून..सुरक्षारक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या Security Guard Murder In Pune Chandni Chowk

पुण्यातील चांदणी चौकात खून..सुरक्षारक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चांदणी चौकात अज्ञात मारेकर्‍याने एका सुरक्षारक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. शहरात गुन्हेगारी फोफावत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल (63,रा.वारजे माळवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

 

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बावधन येथे आज (मंगळवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. सुरक्षारक्षकाची अज्ञात मारेकर्‍याने डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनलाल वारजे चांदणीचौक नजीकच्या केसीपीएल कंपनीत कामाला होते. जीवनलाल हे रात्री नेहमीप्रमाणे कामावर आले होते. मध्यरात्री जीवनलाल यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे. हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे.

 

ही हत्या कुणी आणि का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...