आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेेने 2019 चं रणशिंग फुंकलंय..महाराष्ट्र अस्थिर करून नुकसान करायचे नाही- संजय राऊत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय संयमी, शिस्तप्रत आणि प्रामाणिक नेते आहेत, असे नेहमी आक्रमक असणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 5 वर्षे सरकार स्थिर राहील, या त्यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली तर आज संजय राऊत यांनी युती तुटण्याचे स्पष्ट संकेत दिले. 'आम्ही 2019 चं रणशिंग फुंकलंय. महाराष्ट्र आता अस्थिर करून महाराष्ट्राचे नुकसान करायचे नाही. महाराष्ट्राचे आम्ही देणं लागतो, घेणे नाही. सत्ता हा आमचा हेतू नाही. महाराष्ट्र टिकला पाहिजे. महाराष्‍ट्र अस्थिर झाला तर हे राज्य कोलमडून टाकण्यासाठी अनेक शक्ती या देशात आहेत. काकडे यांनी शिवसेनेचा एक ही उमेदवार येणार नसल्याचे वक्तव्य केले होते, त्यावर बोलताना काकडे कोण, मला माहीत नाही,' असे राऊत यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर, सुलभ उबाळे, राहुल कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नक्षलवादी आमचे मित्र, मात्र त्यांची भूमिका चुकीची, असं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलावे. चंद्रकांत पाटील कर्नाटकात जातात, कानडीचे गोडवे गातात आणि कर्नाटकात जन्म घ्यावासा वाटतो. तर रामदास आठवले यांचे वेगळेच वक्तव्य असते. या संदर्भात त्या मंत्री मंडळाच्या प्रमुखांनी आपले मत व्यक्त करायला हवे, असे राऊत म्हणाले.

 

कोण काकडे? संजय राऊत यांचा पलटवार...
संजय काकडे यांनी पुण्यात केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी 'कोण काकडे?' अशा शब्दात पलटवार केला आहे. जे अशी तुलना करतात, त्यांनी त्यांचे डोके तपासून पाहायला हवे त्यांच्या डोक्यात मेंदू कुठे आहे. हे त्यांनी डॉक्टरांकडून तपासून पाहावे. ते स्वतः विषयी बोलत असतील. युती आता तुटली नसून चार वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने तोडल्यावर आणि मोदींची लाट असताना सुद्धा स्वबळावर 63 आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. तेच आता 2019 च्या निवडणुकीत 150 होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

 

पद्मावत चित्रपट संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी 'मी चित्रपट बघत नाही यावर मी बोलणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...