आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थांनी निरोप समारंभाचा खर्च टाळत गरीब होतकरू विद्यार्थाना केली मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सध्या बहुतांश शाळा, कॉलेजमध्ये 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ सुरु आहेत. आपल्या आई-वडिलांकडून विद्यार्थी पैसे आणतात. या पैशातून पार्टी करतात किंवा शिक्षक, मित्र-मैत्रिणीला भेटवस्तू देतात. परंतु, याला पिंपरी मधील महात्मा फुले महाविद्यालय अपवाद ठरले आहे. येथील विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचा खर्च टाळत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आदर्श निर्माण केला आहे.

 

विद्यार्थ्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थाना वही आणि पेन वाटप करून प्रेरणादायी उपक्रम राबवला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील वंचित विद्यार्थाना तब्बल 510 वह्या आणि पेन दिले आहेत. यामुळे येथील विद्यार्थांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. दहावीमध्ये विद्यार्थी हे शिक्षकांचा आदर करतात. परंतु हेच विद्यार्थी कॉलेजात गेल्यानंतर कट्ट्यावर गप्प्या मारण्यात आणि हिरोगिरी करण्यात दंग असतात. कॉलेजचा निरोप घेण्याची वेळ आली तर त्यावेळी पार्टी करणे, मौज मजा, शिक्षकांना भेट वस्तू देणे इत्यादी चालते.

 

मात्र महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे आणि शिक्षिका अनिता तारळेकर यांनी विद्यार्थाना निरोप समारंभाविषयी मार्गदर्शन करत आपण साध्या पद्धतीने निरोपाचा कार्यक्रम केला. जमा झालेल्या पैशात वंचित आणि गरीब विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त होकार दिला. दरवर्षी हा उपक्रम राबवून गरीब होतकरू विद्यार्थांना मदत करण्याचा मानस शिक्षिका अनिता तारळेकर यांनी व्यक्त केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...