आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहेत मिलिंद एकबोटे? त्यांच्यावर आहे भीमा कोरेगाव दंगल घडविण्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने 20 फेब्रुवारीपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान मुंबई हायकोर्टाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

हेही वाचा... भीमा कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; 20 फेब्रुवारीपर्यंत जामीन

 

1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कटकारस्थान असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या दंगलीचे सूत्रधार पुण्यातील समस्त हिंदु एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला होता. दोघांविरोधात पिंपरी-चिंचवडमधील एका 39 वर्षीय महिलेने या दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्यावर पिंपरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅट्रॉसिटी, दंगल, हत्यारबंदी कायद्यांतर्गत या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी पोलिस स्टेशनमधून हा गुन्हा शिरूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या कोण आहेत मिलिंद एकबोटे..?

बातम्या आणखी आहेत...