आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • खेड तालुक्यात एसची बसमध्ये थरार...धावत्या बसमध्ये कोयत्याने वार करून तरुणाची हत्या Youth Murder In ST Bus At Khed, Pune

बहिणीला छळल्याची तक्रार दिली म्हणून मामेभावाची बसमध्ये हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बहिणीचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल केल्याची तक्रार देणाऱ्या भावाची त्याच्याच आतेभावाने धावत्या बसमध्ये कोयत्याने वार करून हत्या केली.  पुणे-नाशिक महामार्गावरील दावडी येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. श्रीनाथ सुदाम खेसे (१८) असे मृताचे तर अजित भगवान कान्हूरकर असे आरोपीचे नाव आहे. दोघेही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी येथील रहिवासी आहेत. 


अजित हा श्रीनाथचा अातेभाऊ असून श्रीनाथची बहीण सीमाला (बदललेले नाव) त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिने लग्नास नकार दिला होता.  याचा राग मनात धरून अजितने सीमाला दमदाटी करत तिचा विनयभंग केला होता. इतक्यावरच न थांबता तिची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली होती. याबाबत कुटुंबीयांनी अजितविराेधात खेड पोलिसांत तक्रार दिली हाेती. पाेलिसांनी या प्रकरणी अजितला अटक केली. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतरही अजित सीमाला सातत्याने त्रास देतच हाेता.  ७ मे राेजी त्याने सीमाची काही अश्लील छायाचित्रे पुन्हा सोशल मीडियावरून व्हायरल केली.

 

यासंदर्भात सीमाच्या कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘सीमाचे आपल्याशी लग्न न लावून दिल्यास तिच्या आईवडिलांसह भावालाही जिवंत सोडणार नाही,’अशी धमकी दिली. त्यावरून ८ मे रोजी कुटुंबीयांनी अजितविरोधात खेड पोलिसांत पुन्हा तक्रार दिली. मात्र, अातापर्यंत पाेलिसांनी त्याच्यावर काेणतीच कारवाई केली नाही. याचाच फायदा घेत त्याने श्रीनाथची हत्या केल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.  

 

बहिणीच्या डाेळ्यादेखत बसमध्ये मारले भावाला
श्रीनाथ व १५ वर्षीय दुसरी बहीण मंगळवारी सकाळी ७.१५  वाजता राजगुरुनगर-गाेलेगाव बसमध्ये खेडला जाण्यासाठी बसले. अजित त्यापूर्वीच बसमध्ये बसलेला होता. बस सुरू होताच तो सीटवरून उठला. जवळच्या पिशवीतून लाेखंडी काेयता बाहेर काढून काही कळायच्या आतच बेसावध असलेल्या श्रीनाथच्या डाेक्यावर, मानेवर सपासप वार केले. यात श्रीनाथ गंभीर जखमी झाला.  

 

प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवून आरोपी पसार  
 हल्ल्यानंतर अजितने बसमधून पळण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजितचे रौद्ररूप आणि तो कोयता उगारत असल्याचे पाहून त्यांनी माघार घेतली. नंतरर रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या श्रीनाथला खेडच्या सुश्रुत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. त्यामुळे बस पाेलिस ठाण्यात नेण्यात अाली. तिथे नागरिकांनी पाेलिसांना घेराव घालत अाराेपीला अटक करण्याची मागणी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

 

 मिळालेल्या माहिती नुसार आरोपी अजित कान्हुरकर याला रात्री उशिरा  पोलिसांनी अटक केली आहे आरोपी हा मक्याच्या पिकात दिवसभर लपून बसला होता.

 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...