आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रीकरण लवकर पूर्ण करण्याच्या मंजुळेंना सावित्रीबार्इ फुले पुणे विद्यापीठाच्या सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सावित्रीबार्इ फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात गेेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फुटबाॅल विषयाशी संबंधित हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. हे चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंजुळे यांना विद्यापीठाने केल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली. मंजुळे फुटबाॅल विषयावर काढत असलेल्या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांचीही भूमिका अाहे. त्यांच्या चित्रीकरणासाठी मंजुळे यांनी विद्यापीठातील काही भागाची परवानगी मागितली हाेती. चित्रपट खेळावर अाधारित असल्याने विद्यापीठाने त्यांना परवानगी देण्यात अाली हाेती. मात्र, हे चित्रीकरण काही कारणांमुळे लांबले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने नागराज मंजुळे यांना चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या अाहेत. मंजुळे यांनीही ते मान्य केले अाहे. दरम्यान, त्यांनी चित्रीकरणासाठी मैदान वापरण्याचा कालावधी वाढवून मिळावा, अशी विनंती केली हाेती.  त्याला विद्यपीठाच्या व्यवस्थापन विभागाने बैठक घेऊन परवानगी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...