आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतकाळातील चुकांमुळे मिडिया ट्रायल करून माझे भविष्य खराब करू नका- सादिया शेखची विनंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जम्मू-काश्मीरमध्ये प्रजासत्ताकदिनी पुण्यातील १८ वर्षीय तरुणी अात्मघाती बाॅम्बहल्ला करू शकते, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त करत काश्मीरचे पाेलिस महानिरीक्षक (अायजी) मुनीर खान यांनी पत्रक काढल्यानंतर सर्वत्र हाय अर्लटचा इशारा देण्यात अाला हाेता. मात्र, तपासाअंती मी निर्दाेष सिद्ध झाले अाहे. दाेन वर्षांपूर्वी बारावीत असताना साेशल मीडियाच्या माध्यमातून मी इसिस संघटनेबाबत काही कमेंट, मेसेज केले हाेते. त्यावरून दहशतवादविराेधी संघटनेने (एटीएस) माैलवींच्या मदतीने डिरॅडिकलाइज केल्याने मी त्यातून संपूर्णपणे बाहेर पडले. मात्र, माझ्या भूतकाळावरून भविष्य खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप सादिया शेख हिने साेमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.    


जम्मू-काश्मीरमध्ये नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अाईसाेबत १६ जानेवारी राेजी पुण्यातून विमानाने मी श्रीनगरला गेले. एक दिवस अाधी त्या ठिकाणच्या मैत्रिणीला मी येत असल्याची कल्पना दिली हाेती. त्यानुसार महाविद्यालयात प्रवेश हाेईपर्यंत मैत्रिणीकडेच थांबले. २५ जानेवारीला एका वृत्तपत्रात सादिया शेख ही पुण्यातील तरुणी अात्मघाती हल्ला करणार असल्याची बातमी मी वाचली अाणि मला धक्काच बसला. याबाबत अाईला फाेन करून मी विचारणा केली. यादरम्यान, पुणे पाेलिसांनी माझ्या कुटुंबीयाशी संर्पक साधून सादिया कुठे अाहे, अशी विचारणा केली. तसेच  तिला व्हिडिअाे काॅन्फरन्सवर बाेलण्यास सांगा अथवा तिला पुण्यात येण्यास सांगा, असा निराेप दिला. यापुढे काय करायचे याबाबत मी अाईसाेबत बाेलून ठरवत हाेते. दरम्यान ,जम्मू आणि पुणे पोलिसांच्या चौकशीत मी निर्दोष ठरले आहे. मात्र, तरीदेखील माझी बदनामी झाली.भूतकाळावरून माझे  भविष्य खराब करण्याचा  प्रयत्न करू नये, असे आवाहनही तिने केले.

 

मीडिया ट्रायल चुकीची -

  
सादिया शेख हिचे वकील दिनेश गिते यांनी सांगितले की, संविधानाच्या अधिकारानुसार तिने कुठे शिक्षण घ्यावे, कुठे जावे हा तिचा सर्वांसारखाच हक्क अाहे. या घटनेमुळे तिचे कुटुंबीय दहशतीखाली असून प्रसारमाध्यमांनी काही निष्पन्न हाेण्यापूर्वीच मीडिया ट्रायल केली ही चुकीची बाब अाहे. ज्या माध्यमांनी याप्रकरणी चुकीचे वार्तांकन केले त्यांना नाेटीस देण्याबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी करत असल्याचे जमाते मुस्लिम मूल निवासी मंचाचे संयाेजक अंजुम इनामदार यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...