आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च न्यायालयाने दिली डीएसकेंना अखेरची संधी;13 फेब्रुवारीपर्यंत द्यावी परतफेडीची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने साेमवारी अखेरची संधी देऊ केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला डीएसकेनी व्यक्तीशः उच्च न्यायालयात हजर राहून ठेवीदारांच्या पैशाची कशी परतफेड करणार त्याबाबतची माहिती दिली नाही तर, त्यांच्या अटकेचे आदेश द्यावे लागतील, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. मात्र तत्पूर्वी ७ फेब्रुवारीला पुणे येथील चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही दिले.


ठेवीदारांचे सहाशे कोटी रुपये बुडवल्याचा आरोप असलेल्या डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने डीएसकेंना ५० कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते.  मात्र मुदतीत पैसे भरण्यात डीएसके अपयशी ठरले आहेत. 

 

राज्य सरकारवर हायकोर्टाची नाराजी
उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले. डीएसकेंच्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राज्य सरकार करत नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. फक्त डीएसकेंची चौकशी करण्यासाठी त्यांची कस्टडी मागण्याची भूमिका घेण्याव्यतिरिक्त राज्य सरकार काहीही करत नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या प्रकरणात आरोपीच्या अटकेने नेमके काय साध्य होणार आहे, ठेवीदारांच्या पैशाची परतफेड कशी होणार अशा प्रश्नांची सरबत्तीही न्यायालयाने केली.

 

बातम्या आणखी आहेत...