आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद एकबाेटे अखेर स्वत:हून ठाण्यात हजर; पाेलिसांकडून साडेतीन तास चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव-भीमा प्रकरणात एका गटास चिथावणी दिल्याचा आरोप असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शिक्रापूर पाेलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांची साडेतीन तास कसून चाैकशी केली. त्यांना पुन्हा शनिवारी चाैकशीस बोलावले अाहे.


गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी पुणे सत्र कोर्टात केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी मुंबई हायकोर्टात पुन्हा अर्ज दाखल केला. मात्र, तोही हायकोर्टाने फेटाळल्याने एकबाेटेंनी सुप्रीम कोर्टात अपील केले. सुप्रीम कोर्टाने त्यांना १४ मार्चपर्यंत तात्पुरता जामीन दिला. एकबाेटेंच्या चौकशीत पोलिसांनी त्यांना घटनेच्या दिवशी व त्यापूर्वी ते कुठे हाेते, साथीदार काेण होते, आदी प्रश्न केले. 

बातम्या आणखी आहेत...