आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्नर तालुक्यात नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बिबट्याला पकडण्यात अखेर आज वनविभागाला यश आले. ओझर परिसरातील हिवरे खुर्द गावात मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका ऊसतोड महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या बिबट्याची दहशत पसरली होती.

 

 

जुन्नर तालुक्यातील हिवरे पिंपरी पेंढार परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.  आज सकाळी भक्षाच्या शोधात असताना वनविभागाने लावलेल्या पिंजय्रात बिबट्या अडकला. अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात आले आहे. या नरभक्षक बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ला केला होता.

 

 

नरभक्षक बिबट्याला पकडल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास

काही दिवसांपूर्वीच उसतोडणीसाठी 15 ते 16 कामगार हिवरे खुर्द येथील जाधव मळ्यात गेले होते. उस तोडणी चालु असताना बिबट्याने सविता वायसे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ओढून नेले होते. अंधार असल्याने महिलेचा ट्रॅक्टरची लाईट लावून शोध घेण्यात आला. त्यानंतर नागरिकांना बिबट्या महिलेला घेऊन जात असताना दिसला. त्यांनी तसाच ट्रॅक्टर बिबट्याच्या दिशेने उसात नेला. त्यामुळे बिबट्या महिलेला सोडून पळाला. गंभीर जखमी महिलेस ओतुर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करम्यात आले.  मात्र उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र आज नरभक्षक बिबट्याला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...