आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या पिढीच्या लेखकांची वाङ््मय पुरस्कारांवर मोहोर; सहा नव्या लेखकांचे पदार्पणात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नव्या  पिढीकडे वेगळ्या विषयांसोबत वेगळी मांडणी करण्याचेही कसब आहे. सोशल मीडियावर ते व्यक्त होतात. पण मोठा विचार सलगतेने मांडण्याची  सोय सोशल मिडियावर नसते. ‘राजहंस’च्या  संपादकवर्गाने सजगपणे अशी मंडळी हुडकली व त्यांना ‘लिहिते’ केले. एकाचवेळी ६ नव्या लेखकांना राज्य वाड्मय पुरस्काराचा सन्मान नव्या लेखकांच्या, नव्या विचारांना, वेगळ्या मांडणीला मिळाले आहेत, याचा आनंद अधिक मोठा आहे, असे मनोगत ‘राजहंस प्रकाशना’चे दिलीप माजगावकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना  व्यक्त केले.  

 
राज्य सरकारतर्फे वाड्मय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. यात ‘राजहंस’च्या ६ लेखकांचा  समावेश आहे.  हे सर्व पुरस्कारप्राप्त लेखक पहिल्याच  पुस्तकलेखनासाठी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर माजगावकर बोलत होते.


 नव्या पिढीतले लेखक विविध माध्यमांतून व्यक्त होताना दिसतात. वेगळ्या विषयातील कुतूहल हाच लेखनाचा विषय बनतो. त्यातूनच दमदार लेखन करणारे नवे लेखक आम्हाला  गवसले आहेत. नव्या पिढीकडे नव्या प्रश्नांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी, निराळी मांडणी करणारी ‘नजर’ आहे. कुणाकडे लोकविलक्षण अनुभवविश्व आहे.  या वेगळेपणाची ‘बीजे’ आमच्या  संपादकवर्गाने नेमकी हेरली 


आहेत आणि त्या ‘बीजा’चे  वृक्ष कसे फुलारतील, याची  यथायोग्य  काळजी त्यांनी घेतली आहे. विनायकराव पाटील हे राजकारणसंन्यास घेतलेले विलक्षण व्यक्तिमत्त्व  आहे. गेली वीस वर्षे मी स्वत:च त्यांच्यामागे  लागलो होतो, की तुम्ही लिहा. अखेर माझ्या  प्रयत्नांना यश आले आणि ते लिहिते झाले. या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली, की नवी मंडळी मूळची गुणवान आहेतच, पण त्यांना संधी मिळाली तर ते परिश्रम घ्यायलाही तयार असतात. त्यामुळे संपादकवर्गालाही हुरूप येतो आणि सातत्याने नवे गुणवंत लेखक, वेगळे विषय आणि शैलीचे वैविध्य घेऊन ‘राजहंस’ परिवारात सामील होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...