आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल फटांगळे मृत्यूप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी राहुलचा मावस भाऊ तेजस धावडे यांनी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेजस धावडेने ही मागणी केली. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, तुषार काकडे यांचीही उपस्थित होते.

 

 

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चातर्फे बंद पाळण्यात येण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यात तथ्य नाही अशी माहितीही तेजस धावडे यांनी दिली. तसेच बुधवारी कान्हूर मेंसाई या ठिकाणी शोकसभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. राहुल फटांगळेला व्यायामाची आवड होती त्यामुळे त्याच्या नावाने व्यायामशाळा उभारण्यात यावी अशीही मागणी तेजस धावडे यांनी केली. भीमा कोरेगाव आणि त्या शेजारच्या गावांमध्ये हिंसाचार उसळला. या हिंसाचारात गावकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. हे नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे त्याची फक्त घोषणा न करता बॉण्डवर लिहून द्यावे अशीही मागणी धावडे यांनी केली.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...