आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा हिंसा: मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का नाही?- सुप्रीम कोर्टाचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या मिलिंद एकबोटेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर 14 मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा घटनेला 50 दिवस उलटले तरी मिलिंद एकबोटेंना पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही असा सवाल करत प्रशासनाला चांगलेच खडसावले.

 

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. कोर्टाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने एकबोटे यांनी पुणे सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही कोर्टाने नमूद केले होते.

 

सरकारची सुप्रीम कोर्टात फजिती-

 

मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का केली नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला केला. यावर एकबोटे सापडले नाहीत, ते गायब झाले होते असे उत्तर राज्य सराकरच्या वकिलाने दिले. यावर एकबोटेंच्या वकिलाने सरकारचे दावे फेटाळून लावले. आम्ही सातत्याने सहकार्य करायला व पोलिसांत जायला तयार आहोत. तेच बोलवत नाहीत असे सांगतिल्याने राज्य सरकारच्या अब्रूचे खोबरे झाले. यावर सरकारने या प्रकरणी पुन्हा तपास करा व गरज भासली एकबोटेंना अटक करा असे निर्देशच दिले. आता यावर पुढची सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...