आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: मंत्री गिरीश बापट यांच्या मुलाच्या लग्नास मान्यवरांची मांदियाळी, पाहा फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे..... - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे.....

पुणे- पुण्याचे पालकमंत्री गिरीश आणि गिरिजा बापट यांचे चिरंजीव गौरव व सांगली येथील श्रीरंग आणि नीता केळकर यांची ज्येष्ठ कन्या स्वरदा यांचा शुभविवाह बुधवारी सकाळी पुण्यात थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. 

 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, पांडुरंग फुंडकर, चंद्रशेखर बावनकुळे, महादेवराव जानकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मदन येरावार, रणजित पाटील, प्रवीण पाटील, दिलीप कांबळे, सदाभाऊ खोत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी बडे नेते मंडळींनी या विवाहसमारंभास हजेरी लावली.

 

आमदार योगेश टिळेकर, दत्ता बारणे, राहुल कुल, बाळा भेगडे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, शरद रणपिसे, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अनिल भोसले, दिलीप सोपल, राज पुरोहित, बाबूराव पाचरणे, शरद रणपिसे, सुरेश खाडे, अतुल भातखळकर, जगदीश मुळीक, पंकज भुजबळ, बाळा नांदगावकर, श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, अमर साबळे, वंदना चव्हाण, आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, रमेश बागवे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, बाळासाहेब शिवलकर, अशोक पवार, कमल ढोले पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार, विनायक निम्हण, दिलीपराव सोपल, माजी खासदार रणजित मोहिते पाटील, अशोक मोहोळ, काँग्रेसचे विश्वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, गटनेते श्रीनाथ भीमाले, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आदी नेते उपस्थित होते.

 

याशिवाय पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, श्याम जाजू, रवी भुसारी, रवी अनासपुरे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अन्न नागरी पुरवठा सचिव महेश पाठक, पोलिस उपमहासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त पोलिस महासंचालक सीआयडी श्री सिंगल, आयुक्त कुणालकुमार, वजनमापे नियंत्रक अमिताभ गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप, पीएमआयडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, बापट यांच्या चिरंजीवाच्या लग्नाला हजेरी लावलेल्या नेत्यांचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...