आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सर्वात भ्रष्ट, तोतया व घमेंडी; भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -‘ना खाऊंगा न खाने दूंगा,’ असा वायदा करून सत्तेत आलेले नरेंद्र मोदी सरकार हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘स्वतःची बायको लपवणाऱ्या मोदींच्या नसानसात खोटारडेपणा भरला आहे. देशाला मिळालेल्या या तोतया पंतप्रधानांची तोतयेगिरी किती काळ चालू द्यायची याचा निर्णय करावा लागेल,’ असे मत काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले आहे. तर, ‘अहंकार, घमेंडी नेतृत्व बरबादीकडे घेऊन जाईल. हवा रुख बदल रही है,’ असा टोला भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे.


वसंतदादा सेवा संस्थेतर्फे मंगळवारी पुण्यात ‘२०१४ नंतरच्या भारताचा विकास : किती खरा, किती खोटा?’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. यानिमित्ताने चव्हाण, केतकर आणि सिन्हा एका व्यासपीठावर आले होते. सिन्हा म्हणाले,  ‘भाजप २ खासदारांचा पक्ष होता तेव्हापासून मी पक्षात सहभागी आहे. मी देशहिताचे बोलतो म्हणून पक्षविरोधी ठरू शकत नाही. बंडखोरही नाही. पंतप्रधानांची नियत चांगली असली तरी अंमलबजावणीचे काय? भाषणे करण्याची वेळ संपली आहे.  एकखांबी सत्ता असलेले हे सरकार अहंकारी व घमेंडी आहे.


केतकर म्हणाले, ‘नोटबंदीनंतर किती नोटा परत आल्या याचा आकडा रिझर्व्ह बँकेला जाहीर करता आला नाही. मोदी सांगतील तसेच ही बँक वागत आहे. लाल किल्ल्यावरून भाषण करता करताच मोदींनी नियोजन आयोगाची बरखास्ती करून टाकली. मोदींनी माध्यम स्वातंत्र्य संपवून टाकले. मोदींची स्वतःची स्वतंत्र दहशत यंत्रणा देशात काम करते आहे. 

बातम्या आणखी आहेत...