आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चिंचवडमध्ये गुंडाचा धुमाकुळ; अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून केली शरीरसुखाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चिंचवडमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी आकाश राजू काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. काळे हा तडीपार होता, त्याची मुदत संपल्याने काही दिवसांपासून तो परत चिंचवड येथे आला आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तो त्रास देत होता. यामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली होती. आकाश काळेला मुलीच्या घरच्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काही सुधारला नाही. व्हॅलेंटाईनच्या दिवशी दारू पिऊन आलेल्या आकाशने अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करत शरीर सुखाची मागणी केली. यामुळे त्याच्याविरोधात चिंचवड पोलिसात विनयभंग आणि बाल लैंगिक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश काळे हा विवाहित आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक रोहिणी ढेरे या करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...