आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSKच्या अटकपूर्व जामिनावर 22 फेब्रुवारीऐवजी उद्याच सुनावणी; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर 22 फेब्रुवारीऐवजी उद्याच सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांच्या अर्जानंतर मुंबई हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

अटकपूर्व जामिनासाठी डीएसकेंना 50 कोटी रूपये भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, डीएसकेंना ही रक्कम अद्याप कोर्टात जमा करता आलेली नाही. त्यामुळे कोर्टाने तीन-चारदा त्यांचे म्हणणे ऐकत घेत दिलासा दिला होता. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेले डीएसके मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ते आपल्या गुंतवणूकदारांचे व ठेवीदारांचे व्याज व मुद्द्ल देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. डीएसकेंनी आपल्या कंपनीद्वारे वैयक्तिक नफा कमाविल्याचाही आरोप आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...