आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीच्या मेळाव्याला दांडी, भाजपशी जवळिकतेला पुष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयनराजे यांनी पुण्यात आज शरद पवारांसह पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, पक्षाच्या हल्लाबोल मेळाव्याला त्यांनी दांडी मारली. - Divya Marathi
उदयनराजे यांनी पुण्यात आज शरद पवारांसह पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, पक्षाच्या हल्लाबोल मेळाव्याला त्यांनी दांडी मारली.

पुणे- साता-यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील पक्षाच्या हल्लाबोल सांगता समारोप मेळाव्याला दांडी मारली. पक्षाध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, मधुकर पिचड यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली असताना खासदार उदयनराजे यांनी दांडी मारल्याने ते पक्षापासून दूर गेले असल्याची चर्चा रंगली आहे. 

 

राष्ट्रवादी पक्षाने उदयनराजेंकडे दुर्लक्ष केल्याने मागील काही दिवसापासून पक्षापासून फारकत घेताना दिसत आहे. सातारा राष्ट्रवादीतील सर्व आमदार व स्थानिक नेते उदयनराजेंच्या विरोधात गेले आहेत. तसेच उद्यनराजेंना खासदारकीचे तिकीट देऊ नये यासाठी पवारांकडे फे-या मारत आहेत. त्याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन जेव्हा साता-यामध्ये झाले तेव्हा त्यांचे चुलतबंधू आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे नियोजन दिले होते. त्यातून पक्षाने जो द्यायचा तो संदेश उद्यनराजेंना दिला होता. त्यानंतर उदयनराजेंनी आपली कॉलर उडवून पक्षाला आव्हान दिले होते. शरद पवार जेव्हा साता-याच्या दौ-यावर गेले तेव्हा अशी कॉलर करणारे माझ्याकडे सरळ होतात असे सांगत उदयनराजेंना प्रत्त्युत्तर दिले होते. त्यानंतर उद्यनराजे पक्षापासून दूर जात असल्याचे व भाजपशी जवळिक साधू लागल्याचे दिसून आले.

 

उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारमधील एका कार्यक्रमाला बोलावले. त्यानंतर 3 जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी हजेरी लावत फडणवीसांसोबत व्यासपीठावर गेले. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 5 जून (मंगळवारी) रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर आज त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला दांडी मारली आहे. उदयनराजे लवकरच भाजपमध्ये येणार असून, सातारमधून त्यांना लोकसभेची तिकीट दिले जाणार असल्याचे भाजपमधील मंडळी बोलू लागली आहेत.  

बातम्या आणखी आहेत...