आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन ज्ञानाचा अाधुनिक शिक्षण पद्धतीत वापर झाल्यास कल्याणकारी: दलाई लामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती शेजारील देशांपेक्षा विकसित हाेती व मी स्वत:ला नालंदा परंपरेचा विद्यार्थी समजत असल्याने  भारतीय ज्ञानाचा मी पाईक अाहे. सध्याच्या अाधुनिक युगात पारंपरिक ज्ञानाचा विसर पडताना दिसत असून प्राचीन ज्ञानाचा अाधुनिक शिक्षण पद्धतीत वापर केल्यास नवीन पिढीच्या दृष्टीने ते कल्याणकारी पाऊल राहील, असे मत अाध्यात्मिक गुरू दलार्इ लामा यांनी बुधवारी व्यक्त केले.    


मार्इर्स एमअायटीतर्फे अायाेजित दुसऱ्या नॅशनल काँग्रेस परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डाॅ.अनिल काकाेडकर, पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक, एमअायटीचे संस्थापक डाॅ.विश्वनाथ कराड, प्रा.राहुल कराड  उपस्थित हाेते.    


दलार्इ लामा म्हणाले, समाजातील अनेक समस्यांचे मूळ हे मानवनिर्मित असून अधिकार, पैसा यापेक्षा एकमेकांमधील जिव्हाळा, प्रेम, बांधिलकी, जबाबदारी, प्रामाणिकता या गाेष्टींना महत्त्व दिले पाहिजे. समाजात भ्रष्टाचार माेठ्या प्रमाणात दिसत असून त्यात लाेकप्रतिनिधीही सहभागी असल्याचे दिसून येत अाहेत. २० व्या शतकातील संघर्षातून धडा घेऊन २१ व्या शतकात संघर्षाची पुनरावृत्ती न हाेता  शांतता कशी नांदेल याबाबत भावी पिढीला वेळीच शिक्षणाच्या माध्यमातून याेग्य मार्गदर्शन झाले पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...