आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरानेच केला नाटककार दिलीप काेल्हटकर यांच्या पत्नी दीपाली काेल्हटकरांचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध नाटककार दिलीप काेल्हटकर यांच्या पत्नी दीपाली काेल्हटकर (६५) यांच्या गूढ मृत्यूचे रहस्य उलगडण्यात अखेर पाेलिसांना यश अाले अाहे. त्यांच्या घरात काम करणारा केअरटेकर किसन मुंडे (रा. भूम, जि. उस्मानाबाद) यानेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी पाेलिसांनी त्याला अटक केली. काेल्हटकरांकडे दाेन केअरटेकर काम करतात, त्यापैकी एक सुटीवर गेल्यामुळे किसन बदली नाेकर म्हणून त्यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी कामाला अाला हाेता. अापणच दीपाली यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली अाहे. मात्र त्याचा हत्येचा उद्देश त्याने पाेलिसांना सांगितलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...