आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी होतील; रामदास आठवले यांचे भाकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील. असे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले. मात्र अडीचशे जागा मिळवून केंद्रात भाजप सत्तेत येईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला त्‍यांनी यावेळी दिला. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचं केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली. 

 

२०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आणि जिंकणार असल्‍याचा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. जागा कमी होतील, हे आम्ही मान्य करतो. गुजरातमध्ये भाजपाला ११५-१६ जागा मिळतील अस वाटलं होते. मात्र ९९ जागांवर समाधान मानाव लागले. आगामी निवडणुकीत भाजपाला अडीचशे पेक्षा जास्‍त जागा मिळतील. काही राज्यात फटका बसेल अनेक राज्यात भाजपाचे सरकार आलेले आहे, पण थोडा चढउतार राजकारणात असतोच असेही ते यावेळी म्‍हणाले.

 

महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा, सेना आणि आरपीआय ने एकत्रित राहावं हा माझा प्रयत्न आहे. शिवसेनेला सोबत ठेवण गरजेचं आहे. त्यांची काही नाराजी असेल तर दूर करावी. केंद्रात शिवसेनेचा मंत्री करावा, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे २०१९ मध्ये स्वबळावर लढणार असा प्रश्न केला असता, उद्धव ठाकरे यांनी सांगितले असले तरी राजघराण्यात आज एक सांगितले तरी उद्या दुसरं सांगतात असे उत्तर देत उद्धव ठाकरे यांची खिल्लीही  त्‍यांनी उडवली. बोलले असले तरी वेगवेगळ राहणं हिताचे नाही. मतभेद बाजूला ठेवून भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशी भूमिका आठवले यांनी मांडली तर नारायण राणे आमच्या पक्षात आले तर आमची काही हरकत नाही असे देखील ते म्हणाले. मिलिंद एकबोटे यांना अटक न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत आणि तुम्ही ही सत्तेत आहात या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, मी सत्तेत आहे पण माझ्याकडं गृहखाते नाही. आरोपींना लवकरात लवकर पकडलं पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. 

बातम्या आणखी आहेत...