आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार विक्रीतील पैशाच्या वादातून पुण्यात तिहेरी खून;चाैकशीत तीन संशयित निष्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील गणेश पेठेतील नागझरी नाल्यात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडले हाेते. पाेलिसांनी सखाेल चाैकशी केली असता  कचरा, भंगार गाेळा करून साठवलेल्या मालाची विक्री करण्यावरून व त्यातून अालेल्या पैशाचे वाटप करण्यावरून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे शनिवारी उघड झाले. अमली पदार्थाच्या नशेत अाराेपींनी या तिघांचा खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले अाहे. याप्रकरणी पाेलिसांचा तिघांवर संशय असून यापैकी दाेघांना ताब्यात घेण्यात अाले अाहे.   


संदीप अवसरे व नावेद रफिक शेख (दाेघांचीही वये अंदाजे १५ ते १६) अशी मृतांची नावे अाहेत. अन्य एकाची अद्याप अाेळख पटू शकलेली नाही. ससून रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात अाले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट हाेर्इल असे पाेलिसांनी सांगितले अाहे. नावेद, संदीप व अन्य एकाला दगड, फरशी, बांबूची काठी व लाेखंडी राॅडचे साहाय्याने बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अाहे.  याप्रकरणी रवींद्र जगन साेनवणे, विक्रम दीपकसिंग परदेशी या दाेन संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. ते गांजा, व्हार्इटनरची नशा करत असल्याचे स्पष्ट झाले अाहे. त्यांच्याकडे चाैकशी सुरू असून अद्याप त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र, अाराेपींविराेधात भक्कम पुरावे असल्याचा दावा पाेलिसांनी केला अाहे. अाराेपींचा तिसरा साथीदार मुन्ना भंगारवाला हा फरार झाला असून पाेलिस शाेध घेत अाहेत.   

बातम्या आणखी आहेत...