आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते पतंगराव कदम अनंतात विलीन; शाेकाकुल वातावरणात पुणेकरांचा निराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील वांगी येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र विश्वजित कदम यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.  अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


शाेकाकुल वातावरणात पुणेकरांचा निराेप ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात अाले.

सकाळी पावणेसात वाजता बीएमसीसी महाविद्यालयाजवळील ‘सिंहगड’ या निवासस्थानी पार्थिव अाणल्यावर कदम कुटुंबीयांचा शाेक अनावर झाला. या वेळी माेठ्या संख्येने राजकीय, अार्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते अाणि नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन अादरांजली वाहिली. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, देवीसिंह शेखावत, माजी खासदार सुरेश कलमाडी, मंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. अनिल शिराेळे, खा. श्रीरंग बारणे, अामदार माेहन जाेशी, अामदार प्रणिती शिंदे, अामदार निरंजन डावखरे, सिम्बायाेसिसचे संस्थापक डाॅ. शां. ब. मुजुमदार, एमअायटीचे संस्थापक डाॅ. विश्वनाथ कराड, माजी विभागीय अायुक्त प्रभाकर देशमुख, उद्याेजक हनुमंत गायकवाड, सुधीर गाडगीळ यांनी कदम यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सिंहगड बंगला येथून फुलांनी सजवलेल्या टेम्पाेमध्ये त्यांचे पार्थिव गुडलक चाैक-अलका-चाैक-भारती विद्यापीठ भवन-दांडेकर पूल-लक्ष्मीनारायण टाॅकीजमार्गे भारती विद्यापीठ शैक्षणिक परिसर धनकवडी या ठिकाणी नेऊन अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात अाले. त्यानंतर  पार्थिव सांगलीकडे अंत्यविधीसाठी रवाना झाले.

 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सिंहगड बंगला येथे पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...