आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-नगर महामार्गावर ओमनी कारने अचानक घेतला पेट, थोडक्‍यात बचावला चालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-  जिल्ह्यातील शिरूर येथे एका ओमनी कारने रस्त्यावर अचानक पेट घेतल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना घडली. यामूळे पुणे नगर महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेत चालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार , पुणे-नगर महामार्गावरील गव्हाणे मळा येथे ओमनी गाडीने अचानक पेट घेतला. रस्त्याच्या मधोमधच गाडीने पेट घेतल्याने एका बाजूची वाहतूक काहीवेळेसाठी बंद करण्‍यात आली होती. त्‍यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीमध्ये गाडी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. प्रसंगावधान दाखवत चालकाने गाडीतून लगेच उडी मारल्याने चालक सुखरूप आहे. गाडीला आग कागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...