आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पिंपरी येथे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून ऊसाच्या मोळ्या अंगावर पडल्याने वृध्द महिलेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ऊस वाहून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात एक 60 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील पिंपरी येथे घडली आहे. आपल्या नातीला शाळेतून घरी आणण्यासाठी निघालेल्या या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

 

 

पिंपरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील रस्त्यावर ऊस घेऊन जाणारी ट्रॉली काल (8 जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास उलटली. मात्र त्याचवेळी या ट्रॉलीच्या बाजूने जाणाऱ्या सुमन कांबळे यांच्या अंगावर ट्रॉलीमधील ऊस पडल्याने त्या ऊसाच्या मोळ्यांखाली त्या अडकल्या. स्थानिकांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर सुमन यांना बाहेर काढले. अचानक इतका मोठ्या भार पडल्याने बेसावध असणाऱ्या सुमन यांना बाजूला सकरण्यासही वेळ न मिळाल्याने त्या ऊसाच्या भाराखाली सापडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना जवळच्या यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने आज पहाटे सहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...