आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या लॉटरीत अध्यक्षांसह आठ सदस्य \'आऊट\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्यांचा कार्यकाल संपल्याने  त्यांना चिठ्ठीद्वारे बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये भाजपचे 6, राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांचा समावेश आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर सीमा सावळे यांनी कडक भूमिका घेतली. त्यामुळे अनेकांची मने दुखावली होती. रस्त्याच्या विकासकामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीसह शिवसेनेने केला होता. अनेक वेळा सभेत त्यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले होते. त्यामुळे अधिकारी देखील त्यांच्यावर नाराज होते. मात्र पहिल्याच चिठ्ठीत स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांचे नाव निघाले.

 

 

दुपारी दोन वाजता चेंडूमध्ये 16 सदस्यांच्या चिठ्ठया प्रशासकीय यंत्रणेने टाकल्या होत्या. काचेच्या भांड्यातून पत्रकारांच्या हस्ते चेंडू बाहेर काढण्यात आले. यावेळी पहिल्याच चिठ्ठीत स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांचे नाव निघाले. त्यानंतर त्यानंतर एकापाठोपाठ भाजपच्या चार सदस्यांची नावे निघाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सभापतीसाठी चर्चेत असलेल्या हर्षल ढोरे आणि आशा शेडगे यांची नावे निघाली. 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन आठ सदस्यांची नावे घोषित करण्यात येणार आहे असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली आहे.

 

 

नेमकी प्रक्रिया काय आणि कशी

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. चिठ्ठी काढून ती नावे निश्‍चित केली जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आज (बुधवारी) स्थायी समिती सदस्यांचा 'ड्रॉ' काढण्यात आला आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य बाहेर पडलेत तेवढेच पुन्हा नव्याने स्थायीत घेतले जाणार आहेत. त्यांची घोषणा या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.

 

 

पुढील स्लाईडवर बाद झालेल्या सदस्यांची नावे 

बातम्या आणखी आहेत...