आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे प्रकरणात न्याय मिळावा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लेखक, कलाकार, पत्रकार यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून अभिव्यक्ती हक्कासाठी अजूनही संघर्ष करावा लागत अाहे. जगभरात लेखक, पत्रकार यांच्यावरील हल्लयाची 900 केसेसची प्रकरणे प्रलंबित अाहे. डाॅ.नरेंद्र दाभाेलकर, काॅम्रेड गाेविंद पानसरे, साहित्यिक एम.कलबुर्गी, पत्रकार गाैरी लंकेश  यांच्या हत्या वैचारिक पार्श्वभूमीतून झालेल्या अाहेत. याप्रकरणी हल्लेखाेर, सुत्रधार अद्याप ही मिळून न अाल्याने विचारावंतावरील हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. सदर खुन प्रकरणात विचारवतांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी अांतरराष्ट्रीय लेखक अाणि कवींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘पेन इंटरनॅशनल’ या संघटनेचे अध्यक्ष कार्ल्स टाॅरनेर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

 

यावेळी श्रीमती शैला दाभाेलकर, श्रीमती उमा पानसरे, साहित्यिक गणेश देवी, अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख उपस्थित हाेते. यावेळी गणेश देवी म्हणाले, सदर चार विचारवंताच्या हत्या या केवळ मानवी हत्या नसून त्या वैचारिक हत्या असून सध्याचे सरकारला त्याचे दुख वाटत नाही. नैतिक शक्तीपुढे राजकीय शक्तीचा उमद्दमपणा पराजित हाेताे हे इतिहासात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी दाखवून दिले अाहे. सत्तेला अाव्हान देण्याची नैतिक शक्ती नागरीकांमध्ये असून नागरिक काही बाेलत नसले तरी ते याेग्यवेळी स्वत:ची भूमिका घेवून प्रस्थापितांना धक्का देते.

 

यावेळी शैला दाभाेलकर म्हणाल्या, डाॅ.दाभाेलकर यांची हत्या झाली त्याठिकाणावरुन पाच मिनिटावर पाेलीस ठाणे हाेते. मात्र, तरीही पाेलीसांना अाराेपींना अटक करता अाली नसून पाच वर्षाचा प्रदीर्घ कालावधी उलटण्यास अाला तरी मारेकरी सापडले नाही ही शाेकांतिका अाहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यचे महत्व संविधानाने प्रदान केले असून काेणत्याही नागरिकाचा अावाज, विचार दाबले जाऊ शकत नाही. खुनाचे गुन्हयातील मारेकरी, सुत्रधार मिळावे याकरिता नागरिकांनीच सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

खुनाचे अाराेपी मिळावे याकरिता सरकार मध्ये अनिस्था दिसत असून सरकार काही ठाेस पावले उचलत नाही. जे दाेन मारेकरी पकडण्यात अाले त्यांची सुटका करण्यात अाली हा अामच्यावर अन्याय असल्याचे मत उमा पानसरेंनी व्यक्त केले.

 

पुण्यात प्रथमच पेन इंटरनॅशनलची परिषद-

 

पेन इंटरनॅशनल ही जगातील लेखक अाणि कवींचे प्रतिनिधीत्व करणारी सर्वात जुनी संघटना असून तिला 97 वर्ष पूर्ण झाले अाहेत. सदर संघटनेचे काम 100 पेक्षा जास्त देशात विस्तारलेले असून 14 हजार तिचे सदस्य अाहे. संघटनेचे मुख्यालय लंडन येथे असून संघटनेच्या 50पेक्षा अधिक सदस्यांना नाेबेल पारिताेषिक मिळालेले अाहे. भारतातील रविंद्रनाथ टागाेर, प्रेमचंद हे पेन इंटरनॅशनलचे सदस्य हाेते. 

 

भारतीय संविधानात दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार, महात्मा गांधी यांची 150वी जयंती अाणि भारतातील विविधतेतील एकता यामुळे प्रेरित हाेऊन पेन इंटरनॅशनलने प्रथमच भारतात पुणे मध्ये सप्टेंबर महिन्यात पेन इंटरनॅशनल परिषदेचे अायाेजन केले अाहे. यामध्ये जगभरातील लेखक, कवी यांचे प्रतिनिधी सहभागी हाेणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...