आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने अस्वस्थ; पंकजा मुंडे यांनी भाजपला दिला घरचा आहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने विरोधक असताना मला अस्वस्थता वाटायची. आता सत्तेत असतानाही याबाबत अस्वस्थता जाणवते, असे वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला. इंधनावरील कराचे दर कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील तसेच त्याचा जीएसटीत  समावेश करता येईल का, यावर केंद्र   सरकारसोबत मुख्यमंत्री बोलणी करून दीर्घकालीन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 


मोदी सरकारच्या चार वर्षे पूर्तीनिमित्त पंकजा मुंडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. पालघर निवडणुकीवरून सध्या भाजप-शिवसेनेचे चांगलेच वाजले आहे.  यावर त्या म्हणाल्या, भाजप-सेनेने आगामी निवडणूक एकत्र लढवावी याच मताचे आम्ही आहोत.

 

भाजपच्या प्रत्येक नेत्यालाच असे वाटते. शिवसेना दीर्घकाळपासून भाजपसोबत असून त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर काही जागांवर तोटा दोन्ही पक्षांना होतो.  मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप आपण ऐकलेली नाही. मात्र, कार्यकर्त्यांना बळ देणे नेत्याचे काम असते. त्यांना आक्रमक राहायला सांगण्यात गैर काय, असे सांगत पंकजा मुंडे यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणात मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांसह पंकजा  मुंडे यांना वजन कमी करण्याचा सल्ला अलीकडेच दिला होता.

 

त्यावर त्या म्हणाल्या, सध्या फिटनेस चॅलेंजचे वातावरण आहे. असे काही चॅलेंज घेतलेय का, या प्रश्नावर, सध्या तरी मी मेंटली स्ट्राँग आहे, फिजिकलचं माहिती नाही असं गमतीशीर उत्तर त्यांनी दिले.  

 

बातम्या आणखी आहेत...