आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात देहुरोड येथे पीएमपीएमएल बस उलटल्याने 5 जण जखमी; चालक गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे- पीएमपीएमएल चालकाला बस चालवताना अचानक चक्कर आल्याने बस उलटल्याची घटना  देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयासमोर घडली. निगडी - किवळे (एम एच 12, सी एच 3946) ही बस निगडीवरून देहूरोडच्या दिशेने जात होती.

 

 

केंद्रीय विद्यालयासमोर आल्यानंतर बस आल्यावर चालकाला भोवळ आली. त्यामुळे त्याने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नियंत्रण सुटून बसचे एक चाक रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरले. यामुळे बस उघडली. बसमध्ये 25 प्रवासी होते. त्यातील 4 ते 5 प्रवाशांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे तर चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी देहूरोड पोलिस दाखल झाले आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...