आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. पीएमपीएमएलचे माजी व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले बहुतेक निर्णय रद्द करण्यात आले. यात 158 कर्मचा-यांचे करण्यात आलेले निलंबन रद्द करण्याचा प्रस्तावासह ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात करण्यात आलेली वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक पीएमपीएमएलच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याला पुणे महापालिकेसह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह स्थायी समितीचे अध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तुकाराम मुंढेंच्या काळात मंजूर करण्यात आलेला आस्थापना आराखडाही नामंजूर करण्यात आला आहे. सोबतच मुंढेंनी सतत गैरहजर राहणा-या पीएमपीमएलच्या 158 बसचालकांना सेवेतून बडतर्फ केले होते, त्यांना सेवेत परत घेण्याचा निर्णय झाला. मुंढेंच्या काळात ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात वाढ करण्यात आली होती ती वाढही रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
पीएमपी कर्मचा-यांची आत्महत्या-
तुकाराम मुंढे यांनी 158 कर्मचा-यांना निलंबित केले होते. त्यातील एक कर्मचारी तुकाराम मुंडकर यांनी मंगळवारी रात्रीच कामावरून काढल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली होती. या घटनेचेही पडसाद आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत उमटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.